Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»धक्कादायक! नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

क्राईम

धक्कादायक! नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न; जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना

Editorial DeskBy Editorial DeskJune 30, 2026Updated:June 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | पोटच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत अश्लील चाळे करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने पतीविरोधात फिर्याद दिली आहे

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलीचा बाप हा कोणतेही कामधंदा करत नसून तो दिवसभर दारूच्या नशेत राहतो.  २४ जून ते २८ जून दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी सर्व कुटुंब झोपलेले असताना, आरोपीने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलगी हिच्याजवळ जाऊन असलेला जाळे करत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने आरडाओरड केली असता आईला जाग आली आणि तिने पतीला जाब विचारला. यावर आरोपीने पत्नीला आणि मुलीला बेदम मारहाण केली. ​हा संतापजनक प्रकार सतत दोन-तीन रात्री चालू राहिला. आरोपी बापाने पीडित मुलीला आणि तिच्या आईला “हा प्रकार कोणाला सांगितल्यास सर्वांना जीवे ठार मारून टाकीन” अशी गंभीर धमकी दिली. पतीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न करूनही त्याने दारू पिऊन शिवीगाळ व मारहाण करणे सुरूच ठेवले. अखेर, मुलीच्या सुरक्षेसाठी आणि पुढील कोणताही अनर्थ टाळण्यासाठी आईने पोलीस ठाणे गाठून आपल्या पति विरोधात तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add