Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग : चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

क्राईम

ब्रेकिंग : चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी

Editorial DeskBy Editorial DeskJuly 1, 2026Updated:July 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी  | नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचाराच्या पोक्सो प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणात २०२२ मध्ये नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित चार वर्षीय बालिकेवर तिच्याच २८ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. तपास पूर्ण झाल्यानंतर ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले, तर २४ जून  रोजी आरोप निश्चित करण्यात आले.

या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयाने दिला. न्यायालयाने बाल साक्षीदारांची सातत्यपूर्ण साक्ष, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) अहवाल तसेच वैद्यकीय तपासणीतील पुरावे ग्राह्य धरत आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले. वैद्यकीय अहवालात पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि तिच्या खासगी अवयवांवर दुखापती आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भास्कर साळुंखे यांनी केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. जी. काबरा यांनी प्रभावी बाजू मांडली, तर पैरवी अंमलदार अमोल पाटील यांनीही खटल्याच्या कामकाजात समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आरोपीविरुद्धचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन कठोर शिक्षा सुनावण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add