Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी कारवाई : पाचोऱ्यात प्रतिबंधित गुटखा साठवणुकीचा पर्दाफाश; ९ लाखांचा गुटखा व कार जप्त

क्राईम

मोठी कारवाई : पाचोऱ्यात प्रतिबंधित गुटखा साठवणुकीचा पर्दाफाश; ९ लाखांचा गुटखा व कार जप्त

Editorial DeskBy Editorial DeskJuly 2, 2026Updated:July 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरात अन्न सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे ४ लाख ९८ हजार रुपये किमतीचा गुटखा-पानमसाला आणि ४ लाख रुपये किमतीची चारचाकी कार असा एकूण जवळपास ९ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील आशीर्वाद रेसिडेन्सी परिसरात उभी असलेल्या एका चारचाकी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच त्यांनी तत्काळ पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्याशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचे नियोजन केले.

यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, पोलीस कर्मचारी गजानन जोशी व बजुसिंग बंजारा यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संबंधित चारचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या गोण्या आढळून आल्या. त्यानंतर वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करून पाचोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आला.

या कारवाईत (एमएच-१४ जेएम-०३३२) क्रमांकाची चारचाकी कार आणि त्यामधील प्रतिबंधित गुटखा व पानमसाला असा एकूण मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पुनगाव रोडवरील रहिवासी प्रशांत चौधरी याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायळ करीत आहेत. अन्न सुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या या संयुक्त धडक कारवाईमुळे पाचोरा शहरासह परिसरातील प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add