Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»एलसीबीची धडक कारवाई; चोपड्यात गावठी कट्टा व मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी गजाआड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

क्राईम

एलसीबीची धडक कारवाई; चोपड्यात गावठी कट्टा व मॅगझिनसह आंतरजिल्हा टोळी गजाआड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Editorial DeskBy Editorial DeskJuly 3, 2026Updated:July 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलीस दलाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी पिस्तूल, दोन मॅगझिन, तीन मोबाईल आणि एक कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना गुप्त बातमीदारामार्फत एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली होती. काही संशयित इसम कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत असल्याची ती माहिती होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला.

​सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास संशयास्पद ‘ह्युंदाई इऑन’ कार (क्रमांक MH 20 EE 6103) तिथे आली असता, पोलिसांनी ती अडवून पंचांसमक्ष तिची झडती घेतली. यावेळी कारच्या मागील सीटखाली ६० हजार रुपयांचा गावठी कट्टा व १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी ५ लाख रुपयांची कार आणि ३० हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले.

​या प्रकरणी ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९, रा. पाचोरा), सचिन रोशन पवार (वय ३४, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरे साळुंखे (वय ३७, रा. छत्रपती संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अवैध शस्त्रास्त्रांवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेतील हे जळगाव पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add