Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दहा हजारांच्या लाचेपासून कोट्यवधींच्या संपत्तीपर्यंत; किरण चौधरी प्रकरणात नवे धक्कादायक तपशील: घरावर ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती

क्राईम

दहा हजारांच्या लाचेपासून कोट्यवधींच्या संपत्तीपर्यंत; किरण चौधरी प्रकरणात नवे धक्कादायक तपशील: घरावर ‘इन-कॅमेरा’ झाडाझडती

Editorial DeskBy Editorial DeskJuly 3, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले अकोला येथील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या ‘इन-कॅमेरा’ झाडाझडतीत तब्बल २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक व जळगाव एसीबीच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही सखोल तपासणी केली. झाडाझडती दरम्यान घरातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे ६० लाख ५७ हजार १३५ रुपयांचे दागिने, तसेच १५४.५०० ग्रॅम चांदीचे ३१ हजार ४१६ रुपयांचे दागिने आढळून आले.

याशिवाय ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या, ६ लाख २५ हजार ५४५ रुपयांच्या घरगुती वस्तू, तसेच आरोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर विविध ठिकाणी असलेल्या ६२ लाख १३ हजार ३७६ रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे एसीबीने जप्त केली आहेत. सर्व मिळून २.९४ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

दरम्यान, अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना किरण चौधरी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून एसीबीकडून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेची सखोल चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add