Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»धक्कादायक! पत्नीला दारू-गांजा पाजून वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धक्कादायक! पत्नीला दारू-गांजा पाजून वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskJuly 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्याच कायदेशीर पत्नीला जबरदस्तीने दारू आणि गांजाचे व्यसन लावून, तिला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधम पतीसह तीन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीने तिला जबरदस्तीने दारू आणि गांजा पाजला. एवढेच नव्हे तर, धमकी देवून तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करत बेदम मारहाण व शिवीगाळ केली. पीडितेने या कृत्याला कडाडून विरोध केला असता, “जर वेश्या व्यवसाय केला नाही, तर तुला जिवंत मारून टाकेन,” अशी धमकी पतीने दिली. तसेच संशयित पतीने पीडितेकडे माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न आणल्यास आणि वेश्या व्यवसायाला नकार दिल्यास तिला सातत्याने अमानुष मारहाण केली जात होती. पतीच्या या क्रूर छळाला कंटाळून अखेर पीडितेने पोलिसात धाव घेतली.

अमळनेर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, पीडितेच्या तक्रारीवरून संशयित पतीसह अन्य दोन भागीदार अशा एकूण तीन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add