Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महिलांच्या तक्रारीची थेट दखल! कुरंगी गावात बनावट दारू विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव

महिलांच्या तक्रारीची थेट दखल! कुरंगी गावात बनावट दारू विकणारा पोलिसांच्या जाळ्यात

Editorial DeskBy Editorial DeskJuly 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील अवैध धंदे, दादागिरी आणि दारू विक्रीविरोधात महिलांनी उठवलेल्या आवाजाची पाचोरा पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. कुरंगी (ता. पाचोरा) गावात एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या बनावट देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. विष्णू उर्फ विक्की राजू पाटील (मराठे, रा. कुरंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कुरंगी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीमुळे महिला व ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या त्रासाला कंटाळून महिलांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली होती. ३ जुलै रोजी सायंकाळी ५वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्तीवर होते. त्याच वेळी कुरंगी गावात छुप्या मार्गाने दारूची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. महिलांच्या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने कुरंगी गावातील एका घराच्या आडोशाला छापा टाकला.

या कारवाईदरम्यान आरोपी विष्णू पाटील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या बनावट दारूचा साठा बाळगून त्याची चोरटी विक्री करत असताना पोलिसांना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून दारूचा साठा जप्त करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर देविदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार विसपुते करत आहेत. ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आणि अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे कुरंगी गावातील महिलांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचे आभार मानले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add