Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»केमिकल टँकरचा भीषण अपघात; आगीत एकाचा मृत्यू, वाहतूक ठप्प

क्राईम

केमिकल टँकरचा भीषण अपघात; आगीत एकाचा मृत्यू, वाहतूक ठप्प

Editorial DeskBy Editorial DeskJuly 4, 2026Updated:July 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पारोळा प्रतिनिधी | धुळे-पारोळा मार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टँकरचे टायर फुटून आग लागली. या दुर्घटनेत टँकरमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीजे-१८ बीव्ही-८३१५ क्रमांकाचा केमिकल टँकर धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेने जात होता. सबगव्हाण टोलनाक्याजवळ पोहोचल्यानंतर टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरच्या टायरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. त्यामुळे मार्गावर सुमारे अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (TDI) हे अत्यंत क्रियाशील रसायन असल्याची माहिती आहे. हे रसायन प्रामुख्याने लवचिक पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज आणि इलास्टोमर्स तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते. सुदैवाने टँकरमधील केमिकल सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती असून, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add