Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»बापरे…वरखेडे शिवारात 9 फुटांचा अजगर; सर्पमित्र मयूर कदम यांनी केले सुरक्षित रेस्क्यू!

जळगाव

बापरे…वरखेडे शिवारात 9 फुटांचा अजगर; सर्पमित्र मयूर कदम यांनी केले सुरक्षित रेस्क्यू!

Editorial DeskBy Editorial DeskJuly 6, 2026Updated:July 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडे शिवारात तब्बल 9 फूट लांबीचा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रुपसिंग पवार यांच्या शेतात 6 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हा भलामोठा अजगर दिसून आला. अजगर पाहताच शेतातील नागरिक आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती पंचशील नगर, चाळीसगाव येथील सर्पमित्र मयूर कदम यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या आकाराच्या अजगराला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेत मयूर कदम यांनी कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या त्याला पकडले. त्यानंतर सायंकाळी अजगराला पाटणा परिसरातील जंगलात सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.

सर्पमित्र मयूर कदम यांनी आतापर्यंत हजारो विषारी आणि बिनविषारी सापांसह अनेक अजगरांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडले आहे. विशेष म्हणजे, सर्प पकडण्यासाठी ते नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी करत नाहीत. सापांविषयी नागरिकांमध्ये असलेली भीती आणि गैरसमज दूर करण्यासाठीही ते सातत्याने जनजागृती करतात.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add