Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पिण्या योग्य पाण्यासाठी वंचितचा हंडा मोर्चा; भुसावळ नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन 

जळगाव

पिण्या योग्य पाण्यासाठी वंचितचा हंडा मोर्चा; भुसावळ नगरपालिकेचे ढिसाळ नियोजन 

Editorial DeskBy Editorial DeskJuly 6, 2026Updated:July 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी | भुसावळ नगर पालिका प्रशासन शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. त्याचाच निषेध म्हणून आज भुसावळ नगर पालिका कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी कडून हंडा मोर्चा काढण्यात आला.

भुसावळ नगर पालिका ही जिल्ह्यातील एक मोठी नगर पालिका आहे.असे असतांना येथे पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून मिळण्यासाठी शहरातील नागरिकांना मोर्चा निदर्शने करावी लागत असल्याची तीव्र भावना मोर्चा आंदोलनातील पदाधिकारी यांनी व्यक्त करून दाखवली.दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांना पुरवठा होत असलेल्या गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले.

मोर्चाचे नेतृत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,पल्लवी गुरचळ यांनी केले. वंचितचे जिल्हा संघटक बबन कांबळे, उपाध्यक्ष राहुल इंगळे, मीरा वानखेडे, संगीत खरे, रुपेश साळुंके, दीपक सोनवणे, ॲड. प्रवीण इंगळे, नवनीत गायकवाड, रोहित सोनवणे, विलास तायडे, प्रवीण जमदाडे, दिनेश नरवाडे, सिद्धार्थ साळवे, विनोद तिमोती, विजय साळुंखे, पिंटू इंगळे, प्रतीक आव्हाड, जॉन्टी धिवरे, रवींद्र अहिरे, गणेश इंगळे,अरुण सुरवाडे यांच्यासह शेकडो नागरिक महिला उपस्थित होते.

शहरात १० ते १५ दिवसाच्या अंतराने पाणी येत असून.ते पाणी पिण्या योग्य नाही. त्या पाण्यामुळे साथीचे आजार पसरल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल आंदोलकानी उपस्थित नगर पालिका पाणी पुरवठा अधिकारी यांना विचारला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी अमृत जल योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत देखील प्रश्न निर्माण करून नगराध्यक्षांना धारेवर धरले. मोर्चाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने उपमुख्य अधिकारी,पाणी पुरवठा अभियंता व सत्ताधारी नगरसेवक यांनी लवकरच नियमित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाईल असे लेखी आश्वस्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add