Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»प्रशासन»जिल्हा न्यायालयात नवी सुविधा; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते एटीएमचे उद्घाटन

प्रशासन

जिल्हा न्यायालयात नवी सुविधा; माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते एटीएमचे उद्घाटन

Editorial DeskBy Editorial DeskJuly 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी नव्याने एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. या एटीएम सुविधेचा उद्घाटन सोहळा ८ जुलै २०२६ रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. न्यायालय परिसरातच बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्याने वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

उद्घाटनप्रसंगी भूषण गवई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायव्यवस्थेत पक्षकारांच्या सुविधांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. ‘न्यायालय हे पक्षकारांसाठी असते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच न्यायालय आणि वकील यांच्यात सलोखा व समन्वय असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
न्यायालय परिसरात एटीएमची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी बाहेर जाण्याची गरज कमी होणार आहे. विशेषतः दूरवरून न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या पक्षकारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. यावेळी भूषण गवई यांनी जळगाव जिल्हा वकील संघाच्या कक्षाला भेट देत वकिलांना मार्गदर्शन केले. तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी, जिल्हा न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, अन्य न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष सागर चित्रे, जिल्हा सरकारी वकील, बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक व शाखा व्यवस्थापक, वकील संघाचे पदाधिकारी, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add