Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»चोरीच्या सहा दुचाकींसह चोरट्याला अटक: भुसावळ पोलिसांची कारवाई

क्राईम

चोरीच्या सहा दुचाकींसह चोरट्याला अटक: भुसावळ पोलिसांची कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskJuly 9, 2026Updated:July 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरातील मोटरसायकल प्रकरणात भुसावळ शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत मोटरसायकल चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंग शेड येथून फिर्यादी विजय जगन्नाथ खडके यांची सुमारे १५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या पथकाने स्वतंत्र तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.

तपासादरम्यान संशयित आरोपी विशाल राजेंद्र राठोड (वय ४६, रा. सरदार वल्लभभाई मार्ग, अमनखेडे रोड, गणेश मंदिराजवळ, भिकनगाव, जि. खरगोन, मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याच्याकडून सहा चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add