Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»परिवहन»जळगाव–इंदूर थेट विमानसेवा लवकरच;

परिवहन

जळगाव–इंदूर थेट विमानसेवा लवकरच;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

‘फ्लाय ९१’कडून तयारी अंतिम टप्प्यात

जळगाव : महाराष्ट्रातील वेगाने विकसित होत असलेल्या विमानतळांपैकी एक असलेल्या जळगाव विमानतळावरून सध्या मुंबई, पुणे, गोवा आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. आता जळगावकरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी असून, जळगाव लवकरच थेट विमानसेवेद्वारे इंदूरशी जोडले जाणार आहे.

‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने जळगाव–इंदूर मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, या विमानफेरीचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगाव विमानतळावर अलीकडेच नाईट लँडिंगसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुधारित पायाभूत सुविधांमुळे नवीन विमान कंपन्यांना जळगावहून सेवा सुरू करणे सुलभ झाले असून, त्याचा थेट लाभ प्रवाशांना मिळत आहे.

जळगाव–इंदूर विमानसेवा विनाविलंब सुरू होण्याची शक्यता असून, यामुळे खान्देश आणि मध्य प्रदेशातील व्यावसायिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील संपर्क अधिक मजबूत होणार आहेत. सध्या मुंबई व पुण्यासारख्या शहरांसाठी असलेल्या विमानसेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, इंदूरशी थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्यास ही सुविधा जळगावकरांसाठी अधिकच लाभदायक ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add