Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण करत महापौर दीपमाला काळे विठ्ठल चरणी दाखल

जळगाव

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण करत महापौर दीपमाला काळे विठ्ठल चरणी दाखल

Editorial DeskBy Editorial DeskJuly 12, 2026Updated:July 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव/पंढरपूर प्रतिनिधी | जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला आणि जळगाव ते पंढरपूर दरम्यानचे तब्बल ४८५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पार केले.

७५ जणांची सायकलवारी विठ्ठल चरणी दाखल; जल्लोषात सांगता

गुरुवार, दिनांक ९ जुलै  रोजी सकाळी साडेपाच वाजता जळगावच्या आकाशवाणी चौकातून या वारीने प्रस्थान केले होते. राष्ट्रगीत आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षणानंतर निघालेला हा ग्रुप शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचला. पंढरपुरात दाखल होताच सर्व सायकलिस्ट सदस्यांनी आपल्या सायकली हवेत उंचावून वारी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला.
या सायकल वारीमध्ये महापौर दीपमाला काळे यांच्यासह ६० पुरुष आणि ८ महिला अशा ६८ मुख्य सदस्यांसह एकूण ७५ जणांनी हा ४८५ किलोमीटरचा खडतर प्रवास तीन दिवसांत पूर्ण केला.

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन
सायकलवारी पंढरपुरात सुखरूप आणि यशस्वीरीत्या पूर्ण होताच, जळगाव जिल्ह्याचे नेते तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांनी थेट दूरध्वनीवरून व्हिडिओ कॉलद्वारे महापौर दीपमाला काळे आणि सर्व सायकलिस्ट सदस्यांशी संवाद साधला. वारी पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सुदृढ आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश
या वारीच्या यशस्वी पूर्ततेनंतर महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकरांचे आभार मानले. “माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे माझे सलग दुसरे वर्ष आहे. ही केवळ धार्मिक वारी नसून, एक सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणारी चळवळ आहे. सायकल चालवण्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहतेच, शिवाय इंधनाची बचत होऊन पर्यावरणाचे रक्षण होते, हाच संदेश आम्हाला या वारीतून द्यायचा होता,” असे महापौर दीपमाला काळे म्हणाल्या.

विठ्ठलाला साकडे:

“गेल्या १५३ दिवसांत जळगाव शहराची प्रथम नागरिक म्हणून काम करताना मी ‘आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण’ या गोष्टींना नेहमीच प्राधान्य दिले आहे. विठ्ठलाच्या चरणी लीन होताना मी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या सुखासाठी आणि जळगाव शहराच्या शाश्वत विकासासाठी साकडे घातले आहे. जळगावला स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आम्ही जे ‘विकास व्हिजन’ हाती घेतले आहे, त्याला पांडुरंगाने बळ द्यावे हीच प्रार्थना केली,” अशी भावना महापौर काळे यांनी व्यक्त केली.

जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या या यशस्वी उपक्रमाचे आणि विशेषतः महापौरांच्या या जिद्दीचे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आणि राजकीय स्तरातून मोठे कौतुक होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add