Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

जळगाव

महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

राज्यातील महापालिकांच्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात;

राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये आता सत्तास्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठीचा सविस्तर कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे.

महापौर, उपमहापौर पदाच्या निवड कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांची निवड प्रक्रिया कशी असणार, पाहुयात….

२२ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिकांचं महापौर पदाचा आरक्षण सोडत…

२३ जानेवारी २०२६ रोजी आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरसचिवांची महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता निर्वाचित सदस्यांचे प्रथम बैठक बोलवण्यासाठी तारीख व वेळ निश्चितसाठी संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा. (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून)

२४ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ रोजी विभागीय आयुक्तांकडून महानगरपालिकांच्या पहिल्या सभेची तारीख व पीठासीन अधिकारी निश्चित करण्यात येणार आहेत. या सभांची सूचना स्थानिक वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केली जाणार आहे.

२७ आणि २८ जानेवारी २०२६ रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांकडून नामनिर्देशन अर्ज दाखल केले जातील.३० जानेवारी आणि ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे.(या निवड प्रक्रियेमुळे राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये नवी सत्ता रचना स्पष्ट होणार) राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add