Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»जळगाव महानगरपालिकेत भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटानेही गटनेता जाहीर केला

राजकारण

जळगाव महानगरपालिकेत भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटानेही गटनेता जाहीर केला

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

महापालिकेत शिवसेना शिंदे गटाच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळेंची निवड..

जळगाव । जळगाव महानगरपालिकेत भाजपनंतर आता शिवसेना शिंदे गटानेही गटनेता जाहीर केला आहे. गुरुवारी नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यात आली. यामध्ये जिल्हाप्रमुख आणि नवनिर्वाचित नगरसेवक विष्णू भंगाळे यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे.

नुकत्याच झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने दमदार कामगिरी केली. या निवडणुकीत शिवसेनेचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या त्रिसूत्री नेतृत्वाखाली शिवसेनेने ही मुसंडी मारली आहे. या विजयामुळे जळगाव शहराच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या प्रक्रियेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला गट अधिकृतपणे नोंदवला. यात गटनेतेपदाची माळ विष्णू भंगाळे यांच्या गळ्यात पडली असून उपगटनेते प्रतिभा देशमुख तर प्रतोद (Whip) दिलीप पोकळे यांची निवड करण्यात आली.

दरम्यान दुसरीकडे जळगाव महापालिकेत भाजपकडून प्रकाश बालानी यांची गटनेतेपदी निवड झाली तर नितीन बरडे यांची उपगटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add