Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग न्यूज : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची चाकूने हत्या; नराधम पतीला अटक

क्राईम

ब्रेकिंग न्यूज : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीची चाकूने हत्या; नराधम पतीला अटक

Editorial DeskBy Editorial DeskJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून पतीने तिच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी पतीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.

ललिता आत्माराम राठोड (वय 36) असे मृत महिलेचे नाव असून, आत्माराम पतीलाल राठोड (वय 40, रा. वसंतवाडी तांडा) असे आरोपीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आत्माराम राठोड याने घरातील धारदार चाकूने ललिता यांच्या पोटावर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला.

या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी आत्माराम राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार पुढील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; मोटारसायकल चोर अटकेत, दोन दुचाकी जप्त

July 28, 2026

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add