जळगाव प्रतिनिधी | जळगावातील एमआयडीसी पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल करण्यात संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक केले असता तपासादरम्यान तांबापुरा, मेहरूण भागातील साहिल उर्फ मोहम्मद तडवी (वय 23) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे 30 हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स आणि 15 हजार रुपये किमतीची आणखी एक हिरो एचएफ डिलक्स अशा एकूण 45 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.



