Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»प्रशासन»आरटीओ»इच्छादेवी चौकात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

आरटीओ

इच्छादेवी चौकात भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskJuly 29, 2026Updated:July 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील इच्छादेवी चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.

भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच 19 बीएल 7077) दुचाकी (एमएच 19 ईसी 9084) ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात लीलाधर मंगल पाटील (वय 36, रा. कठोरा, ता. जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की कारने सलग दोन वेळा पलटी घेतली. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. नागरिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली.

मृत लीलाधर पाटील हे सध्या जळगाव शहरातील चंदू अण्णानगर येथे वास्तव्यास होते. ते दररोजप्रमाणे एमआयडीसीतील निर्मल पाईप कंपनीत कामावर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र, इच्छादेवी चौकात झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, लीलाधर पाटील यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add