Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी बातमी : आंतरजातीय विवाहाचा राग अनावर; तरुणावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

क्राईम

मोठी बातमी : आंतरजातीय विवाहाचा राग अनावर; तरुणावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskAugust 1, 2026Updated:August 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडगाव सहो येथे आंतरजातीय प्रेमविवाहाच्या वादातून घडलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुभाष चौधरी (वय 29) याने संशयित आरोपी अभिषेक संतोष मोरे याच्या बहिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग मनात धरून अभिषेक मोरे याने प्रशांतवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यावेळी त्याच्या डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत करण्यात आली होती.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी प्रशांत चौधरी याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर फत्तेपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अभिषेक मोरे याला अटक केली होती. सुरुवातीला गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, जखमीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणात खुनाचे कलम वाढवून गुन्ह्याची नोंद केली आहे.

या घटनेचा पुढील तपास फत्तेपूर पोलीस करत असून, आंतरजातीय विवाहाच्या कारणातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add