Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»Breaking News: जन्मदात्या बापाचे क्रौर्य! झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

क्राईम

Breaking News: जन्मदात्या बापाचे क्रौर्य! झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

Editorial DeskBy Editorial DeskAugust 2, 2026Updated:August 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चोपडा | विलास पाटील

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने हल्ला केल्याची अत्यंत धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली.

या हल्ल्यात 13 वर्षीय मीरा सुभाष भिलाला हिचा जागीच मृत्यू झाला, तर 11 वर्षीय रामु सुभाष भिलाला हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय 50) हा घटना घडल्यानंतर जंगलाच्या दिशेने फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुले घरात झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा अन्य कोणते कारण याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

घटनेनंतर वडती गावासह परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण चोपडा तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add