Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

क्राईम

जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Editorial DeskBy Editorial DeskAugust 4, 2026Updated:August 4, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या कंपनीत मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीतून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा उसळत असल्याचे लक्षात येताच तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

सुरुवातीला दोन ते तीन अग्निशमन बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता आणखी अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. एकूण सहा ते सात अग्निशमन बंबांच्या मदतीने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आग पूर्णपणे आटोक्यात आणली. वेळेत आग नियंत्रणात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या घटनेत कंपनीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आग लागण्याचे नेमके कारण आणि नुकसानीचा अचूक आकडा याबाबत संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.

या बचावकार्यात वाहनचालक युसूफ पटेल, मयूर ओतारी, शोएब तडवी तसेच फायरमन योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, इक्बाल तडवी, राकेश पाटील, विक्की सोनवणे आणि सतार तडवी यांनी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add