Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»QR कोड नसलेल्या जुन्या जन्मदाखल्यांमुळे नागरिकांची गैरसोय; नगराध्यक्षांचे शासनाला निवेदन

जळगाव

QR कोड नसलेल्या जुन्या जन्मदाखल्यांमुळे नागरिकांची गैरसोय; नगराध्यक्षांचे शासनाला निवेदन

Editorial DeskBy Editorial DeskAugust 6, 2026Updated:August 6, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी : यावलमध्ये सुरू असलेल्या एसआयआर (SIR) मॅपिंग मोहिमेसह विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेल्या जन्म व मृत्यू दाखल्यांबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. जुन्या दाखल्यांवर QR कोड नसल्यामुळे त्यांची ऑनलाइन पडताळणी होत नसून नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करणारे स्मरणपत्र पाठविले आहे.

स्मरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे, नगरपरिषदेकडील अनेक जुन्या जन्म-मृत्यू नोंदवह्या जीर्ण अवस्थेत असून त्या आधारे नवीन QR कोडयुक्त दाखले देण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय योजना, शिक्षण, बँकिंग, न्यायालयीन प्रक्रिया तसेच एसआयआर मॅपिंगसारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जुन्या दाखल्यांना वैधता देणे, जीर्ण नोंदींच्या आधारे QR कोडयुक्त नवीन दाखले देण्याची प्रक्रिया निश्चित करणे आणि आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने तातडीने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी नगराध्यक्ष छाया पाटील यांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add