Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पाण्यात उतरला अन् काळाचा घाला! धवलतीर्थच्या धबधब्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

क्राईम

पाण्यात उतरला अन् काळाचा घाला! धवलतीर्थच्या धबधब्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

Editorial DeskBy Editorial DeskAugust 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव  प्रतिनिधी | तालुक्यातील प्रसिद्ध पाटणादेवी पर्यटनस्थळावर पुन्हा एकदा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. धवलतीर्थ धबधब्याच्या पाण्यात बुडून २३ वर्षीय कृष्णा संतोष गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कृष्णा हा कन्नड येथील रहिवासी होता.

धबधब्याच्या पाण्यात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनपाल कैलास चव्हाण आणि राजाराम चव्हाण यांनी शोधमोहीम राबवत मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत केली. पोलिसांच्या पथकानेही घटनास्थळी आवश्यक कार्यवाही केली.

मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी चाळीसगावच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आला असून, पोलिसांकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, पावसाळ्यात धवलतीर्थला पर्यटकांची मोठी गर्दी होते. मात्र खोल पाणी, वेगवान प्रवाह आणि घसरडे दगड यामुळे हा परिसर धोकादायक ठरत आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कधी होणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्यटकांनी जीव धोक्यात घालून पाण्यात उतरणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add