चाळीसगाव प्रतिनिधी : अजिंठा घाटामध्ये ट्रक बंद पडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. ट्रक रस्त्यातच बंद पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सुमारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्न केले. मात्र घाटातील अरुंद रस्ता आणि वाहनांची मोठी संख्या यामुळे वाहतूक सुरळीत करण्यास अडथळे निर्माण झाले.
अजिंठा घाटामध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, काही वाहनधारकांनी अजिंठा घाटासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.



