Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डरमधून अनेकांची फसवणूक : मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

क्राईम

कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्क ऑर्डरमधून अनेकांची फसवणूक : मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Editorial DeskBy Editorial DeskAugust 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावावर कोट्यवधींच्या फसवणुकीचा धक्कादायक खेळ सुरू असल्याचा गंभीर खुलासा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. कुंभमेळ्यात कंत्राट मिळवून देतो, मोठी कामे मिळवून देतो, असे आमिष दाखवत राज्यभरातील नागरिकांकडून लाखो-कोट्यवधी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे या फसवणुकीसाठी ऑनलाइन बनावट कागदपत्रे आणि चक्क विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाच्या बनावट वर्क ऑर्डरचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा, चौरंग आणि इतर कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. कागदपत्रे हातात दिली आणि त्यानंतर पैसे उकळले गेले.

जामनेरमधील दोन जणांसह धुळे, मुंबई आणि राज्यातील इतर भागांतील नागरिकही या फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती आहे. पीडितांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत कडक कारवाईचे आदेश दिल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांकडेही तक्रार करण्यात आली आहे.
आता प्रश्न आहे—कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणुकीचा हा खेळ नेमका किती मोठा आहे? आरोपींच्या अटकेनंतर राज्यभरातील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

म्हणूनच कुंभमेळ्याच्या नावावर कोणतेही कंत्राट, वर्क ऑर्डर किंवा सरकारी काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले जात असेल, तर पैसे देण्याआधी कागदपत्रांची अधिकृत खात्री करा; अन्यथा मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add