Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»भावजयीच्या खुनाचा चार वर्षांनी निकाल; सख्ख्या दिराला जन्मठेपेची शिक्षा!

क्राईम

भावजयीच्या खुनाचा चार वर्षांनी निकाल; सख्ख्या दिराला जन्मठेपेची शिक्षा!

Editorial DeskBy Editorial DeskAugust 11, 2026Updated:August 11, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी  | मालमत्तेच्या कागदपत्रांवरून झालेला वाद थेट भावजयीच्या हत्येपर्यंत पोहोचला आणि अखेर तब्बल चार वर्षांनी या खूनप्रकरणाचा निकाल लागला आहे. पिंप्राळा परिसरातील मधुर कॉलनीत २१ मे २०२२ रोजी योगिता मुकेश सोनार यांच्या झालेल्या खूनप्रकरणी आरोपी सख्खा दीर दिपक लोटन सोनार याला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, मालमत्तेच्या कागदपत्रांवरून दिपक सोनार आणि त्याची भावजय योगिता सोनार यांच्यात वाद झाला होता. २२ मे रोजीच्या रात्री सुमारे सव्वानऊ वाजता हा वाद विकोपाला गेला. संतापलेल्या दिपकने योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याचे समोर आले. गंभीर जखमी झालेल्या योगिता यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपीने कुऱ्हाड घटनास्थळी फेकून तेथून निघून गेल्याचे तपासात समोर आले.

या प्रकरणात मृत योगिता यांच्या अल्पवयीन मुलाची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याच्यासह सरकार पक्षाने तब्बल १७ साक्षीदार तपासले. पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, शासकीय दस्तऐवज परीक्षक आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या साक्षी न्यायालयीन सुनावणीत निर्णायक ठरल्या.

सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सादर केलेले साक्षी-पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा न्यायाधीश-२ ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने आरोपी दिपक लोटन सोनारला दोषी ठरवले. आणि त्याला जन्मठेपची शिक्षा सुनावली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add