Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»Breaking : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी चार जणांना अटक

क्राईम

Breaking : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी चार जणांना अटक

Editorial DeskBy Editorial DeskAugust 13, 2026Updated:August 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

वरणगाव प्रतिनिधी | वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार प्रौढ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात एका विधी संघर्षित बालकाचाही समावेश असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या अज्ञानाचा आणि परिस्थितीचा फायदा घेत तिला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी मनोहर रामा पाटील (वय ६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (वय ६४), नारायण सोमा चौधरी (वय ५०) आणि विनायक वसंत पाटील (वय ५२) या चार प्रौढ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या सुमारे वर्षभरात आरोपींनी स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या वेळी पीडितेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास वरणगाव पोलीस करीत असून तपासादरम्यान आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add