Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»राष्ट्रपती पदक जाहीर; छायाचित्रकार जयंत चौधरी यांचा विशेष सत्कार

क्राईम

राष्ट्रपती पदक जाहीर; छायाचित्रकार जयंत चौधरी यांचा विशेष सत्कार

Editorial DeskBy Editorial DeskAugust 19, 2026Updated:August 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव  प्रतिनिधी | जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून जळगाव पोलीस दलात छायाचित्रकार म्हणून उल्लेखनीय सेवा बजावणारे जयंत चौधरी यांचा प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पोलीस महासंचालकांनी त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर केले आहे. या सन्मानामुळे जळगाव पोलीस दलासह छायाचित्रण क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

जयंत चौधरी यांनी सेवाकाळात पोलीस दलातील विविध महत्त्वपूर्ण घटना, उपक्रम, सामाजिक जनजागृती कार्यक्रम तसेच विविध प्रसंगांचे छायाचित्रण जबाबदारीने केले. प्रसंगाचे अचूक चित्रण, तत्परता, व्यावसायिकता आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांचा त्यांनी सातत्याने परिचय दिला. त्यांच्या कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेत राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर सय्यद यांच्या हस्ते जयंत चौधरी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमास वैभव धर्माधिकारी, सतीश जगताप, अतुल वडनेरे, दिलीप कोळी, मतीन सय्यद, दीपक देवरे, राज सय्यद यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

छायाचित्रकार हा केवळ प्रसंग कॅमेऱ्यात टिपणारा नसून, महत्त्वाचे क्षण इतिहासासाठी जतन करणारा साक्षीदार असतो. या दृष्टीने चौधरी यांनी बजावलेली सेवा कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले. राष्ट्रपती पदक हा त्यांच्या कार्याचा सन्मान असून, पुढील वाटचालीसाठी तो प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add