Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मारहाण अन् शेतात घुसखोरी; ५ आरोपी दोषी: पिंपळगाव हरे प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल

क्राईम

मारहाण अन् शेतात घुसखोरी; ५ आरोपी दोषी: पिंपळगाव हरे प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल

Editorial DeskBy Editorial DeskAugust 21, 2026Updated:August 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात दाखल मारहाण आणि शेतात अनधिकृत प्रवेशाच्या प्रकरणात न्यायालयाने रमेश गुलचंद परदेशी (वय २४) व त्याच्या चार साथीदारांना दोषी ठरवत दंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पिंपळगाव हरे पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

पिंपळगाव हरे पोलीस ठाण्यात सन २०२२ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींविरुद्ध मारहाण तसेच शेतात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी पाचोरा येथील न्यायालयात झाली.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान फिर्यादी, पंच तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १२ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या साक्षी आणि तपासातून समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले.

न्यायालयाने रमेश गुलचंद परदेशी व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध दोषसिद्धी करत एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पाचोरा विभागातील अधिकारी तसेच पिंपळगाव हरे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.

तपास अधिकारी अरविंद मोरे यांनी तपास पूर्ण केला. तर न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. साक्षीदारांनी न्यायालयात प्रभावी साक्ष द्यावी यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. अखेर या प्रकरणात आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add