Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश; लाकडी कपाट फोडून रोकड घेऊन चोरटे पसार

क्राईम

कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश; लाकडी कपाट फोडून रोकड घेऊन चोरटे पसार

Editorial DeskBy Editorial DeskAugust 23, 2026Updated:August 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

धरणगाव प्रतिनिधी | तालुक्यातील सावदे प्रचा परिसरात बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट फोडत तब्बल 55 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, धरणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शरद काशिनाथ पवार (वय 38, व्यवसाय शेती, रा. विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे, सावदे प्रचा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे आपल्या कुटुंबासह राहत आहेत. 21 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपासून 22 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले.

चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यात ठेवलेली 55 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. या रकमेमध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या चलनी नोटांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add