Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पोहरे येथे गॅस गळतीमुळे भीषण आग! घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक!

क्राईम

पोहरे येथे गॅस गळतीमुळे भीषण आग! घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक!

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 3, 2026Updated:September 3, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील पोहरे येथून एक धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. घरात गॅस गळती झाल्यामुळे अचानक आगीचा भडका उडाला आणि काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या वेढ्यात सापडले.

​मिळालेल्या माहितीनुसार, पोहरे येथील एका घराच्या स्वयंपाकघरात गॅस लिकेज होऊन सिलेंडरच्या रेग्युलेटरने अचानक पेट घेतला. बघता बघता ही आग किचनमधून बेडरूममध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की घरातील फ्रिज, कपाट, रोख रक्कम, कपडे आणि सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू आगीत संपूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

​या घटनेदरम्यान घरातील एक महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर स्थानिक स्तरावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने, आग लागल्यानंतरही गॅस सिलेंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे परिसरातील मोठा अनर्थ आणि संभाव्य जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add