रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहितेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पीडित विवाहिता घरात एकटी असताना आरोपी तिच्या घराजवळ आला. त्यानंतर त्याने कथितरित्या घरात बेकायदेशीर प्रवेश करून आतून दरवाजाची कडी लावली. त्यानंतर पीडितेला मारहाण करत तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सखाराम कांबळे पुढील तपास करीत आहेत. तपासादरम्यान घटनेशी संबंधित अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



