Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जिल्ह्यात सहा नगरपरिषदांच्या नऊ जागांसाठी आज मतदान

ताज्या बातम्या

जिल्ह्यात सहा नगरपरिषदांच्या नऊ जागांसाठी आज मतदान

Editorial DeskBy Editorial DeskDecember 20, 2025Updated:December 21, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

उद्या १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींची मतमोजणी व निकाल

जळगाव : जिल्ह्यात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सहा नगरपरिषदांमधील काही जागांच्या निवडणुका न्यायालयीन अपील व इतर कारणांमुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात आली असून, माघारीनंतर तीन जागा बिनविरोध ठरल्या आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठी आज शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होत आहे.

या नऊ जागांसह २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींतील एकूण ४५२ नगरसेवक पदे तसेच १७ ठिकाणी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठीची मतमोजणी रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या निकालाबाबतची नागरिकांची उत्सुकता अखेर संपणार आहे.

न्यायालयीन स्थगितीमुळे भुसावळ, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल आणि वरणगाव या सहा नगरपरिषदांमधील १२ जागांची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यापैकी भुसावळ नगरपरिषदेत एक तर सावदा नगरपरिषदेत दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून आज या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महत्त्वाचा आदेश दिला आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी म्हणजे दि. २० व २१ डिसेंबर रोजी नगरपालिकांच्या हद्दीतील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.

दि. २१ डिसेंबर रोजी भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, सावदा, यावल, वरणगाव, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, नाशिराबाद या नगरपरिषदांमध्ये तसेच मुक्ताईनगर व शेंदुर्णी या नगरपंचायतींमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष आता निकालांकडे लागले आहे.

बिनविरोध निवड झालेल्या जागांमुळे काही ठिकाणी तणावमुक्त वातावरण असले तरी उर्वरित नऊ जागांसाठी चुरस कायम आहे. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारे ठरणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add