Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शिववंदन फाउंडेशनचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रभक्तीपूर्ण उपक्रम;

जळगाव

शिववंदन फाउंडेशनचा प्रजासत्ताक दिनी राष्ट्रभक्तीपूर्ण उपक्रम;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भारत माता पूजन व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

जळगांव : २६ जानेवारी रोजी भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिववंदन फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर येथील काळे नगर परिसरात भारत माता पूजन व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजू मामा भोळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदौर येथील नामवंत व्यावसायिक चंद्रकांत कुंजिर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक विजय जगताप व निलेश तायडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना आमदार राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देत स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच देशसेवेची भावना जोपासावी, असे मार्गदर्शन केले. शिववंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ तसेच शालेय विद्यार्थिनी शुभ्रा विशाल वाघ यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मंचावर माजी नगरसेवक संजय राठोड, फाउंडेशनचे अध्यक्ष विजय राठोड, उपाध्यक्ष विशाल वाघ, शिवसेनेचे गजानन मालपुरे, दिलीप नाझरकर, भगवान सोनवणे, गणेश बाविस्कर, महेश चौधरी, नरेंद्र भोसले, विनायक पाटील, कामिल खान, तसेच दीपक सुरळकर (सर) यांची उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिववंदन फाउंडेशनचे सदस्य रवींद्र पाटील, संदीप पवार (सर), समीर खाटीक, माजी सैनिक मुकेश भालेराव, वाल्मीक वाघ, आशिक जोहरे, दिलीप माळी, विजय चौधरी, मनोज जाधव व अंशू वाघ यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add