Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अस्वच्छता आणि अतिक्रमणांवर महापौरांचा दणका; धूळखात पडलेली वाहने हटवण्याचे आदेश!

क्राईम

अस्वच्छता आणि अतिक्रमणांवर महापौरांचा दणका; धूळखात पडलेली वाहने हटवण्याचे आदेश!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 23, 2026Updated:October 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शहरातील स्वच्छता आणि नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात गटारींची दुरवस्था, अतिक्रमणे, रस्त्यांवरील अडथळे आणि पाण्याचा अपव्यय निदर्शनास आल्याने महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही दिले.

गणेश कॉलनी चौकातील गुरुदत्त मंदिर परिसरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या बंद टपऱ्या हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रभागातील अनेक ठिकाणी गटारींची वेळेवर सफाई झाली नसल्याचे आढळले. गटारींवरील अतिक्रमणे हटवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश आरोग्य आणि बांधकाम विभागाला देण्यात आले.

बजरंग बोगदा परिसरात धूळ खात पडलेले साहित्य, अतिक्रमणांचे सांगाडे आणि वाढलेले गवत तातडीने हटवण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याशिवाय तीन ठिकाणी बंद अवस्थेत उभी असलेली चारचाकी वाहने हटवण्याची सूचनाही करण्यात आली.

पाहणीदरम्यान एका ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे आढळल्याने संबंधित व्यक्तीला नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. शहर स्वच्छ आणि सुटसुटीत ठेवण्यासाठी मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशाराही महापौरांनी दिला.

दरम्यान, श्रीहरी नगर परिसरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी करून महापौरांनी नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, विशाल भोळे, अंकिता पंकज पाटील आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add