Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अवकाळी पावसाची हजेरी रब्बी हंगामातील गहू,मक्का,ज्वारी,बाजरी,

ताज्या बातम्या

अवकाळी पावसाची हजेरी रब्बी हंगामातील गहू,मक्का,ज्वारी,बाजरी,

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

हरभरा,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

जळगाव –  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून त्यामुळे कडाक्याची थंडी जाणवत नाहीये. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

ऐन हिवाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. केळी पिकांसह रब्बी हंगामातील गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यातील हुडहुडी भरणारी थंडी जवळपास गायब झाली असून ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ-उतारामुळे गारठा ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी एक ते दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जळगावकरांना ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारख्या वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add