Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग: जेवण न दिल्याच्या रागातून आईची हत्या;  मुलाला अटक

क्राईम

ब्रेकिंग: जेवण न दिल्याच्या रागातून आईची हत्या;  मुलाला अटक

Editorial DeskBy Editorial DeskOctober 26, 2026Updated:October 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी |  जेवण न दिल्याच्या कारणावरून मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील येवती येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अलकाबाई पुरुषोत्तम वाघ असे असून त्यांचे वय ६३ वर्षे होते. त्या बोदवड तालुक्यातील येवती येथे मुलगा गणेश वाघ यांच्यासोबत राहत होत्या.

संशयित आरोपी गणेश पुरुषोत्तम बाग याने आईने जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून राग मनात धरून रविवारी 25 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता झोपेत असलेल्या आईच्या डोक्यात लोणच्याची बरणी आणि लोखंडी खुरपने याने वार करून तिची निर्घुण हत्या केली.

घटनेनंतर या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी गणेश वाघ याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add