Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग : कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत!

क्राईम

ब्रेकिंग : कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; आरोपी अटकेत!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 26, 2026Updated:October 26, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेत आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. संशयित सुरज वानखेडे याने सनीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर जखमी सनीला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. ऐन तारुण्यात सनीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी सुरज वानखेडे याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. कौटुंबिक वादातून घडलेल्या या जीवघेण्या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add