Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»कासोदा पोलिसांचा अवैध वाळू वाहतुकीवर मोठा दणका! चार वाहने अन् ७६ ब्रास वाळूसह जप्त

क्राईम

कासोदा पोलिसांचा अवैध वाळू वाहतुकीवर मोठा दणका! चार वाहने अन् ७६ ब्रास वाळूसह जप्त

Editorial DeskBy Editorial DeskOctober 26, 2026Updated:October 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात कासोदा पोलीस व एरंडोल महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत वाळू वाहतूक करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. या कारवाईत तीन डंपर आणि एका आयशर वाहनासह एकूण चार वाहने तसेच ७६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ३२ लाख ५८ हजार २०७ रुपये असल्याची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

२५ आणि २६ ऑक्टोबर रोजी उत्राण येथील मारवती मंदिराजवळ तसेच कर्दन शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरात ही कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या प्रकरणांमध्ये संबंधित वाहनचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि महसूल विभागाच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला.

अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली. जप्त केलेल्या वाहनांसह वाळूमुळे अवैध वाहतुकीविरोधातील कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add