Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जिल्हा बँक निवडणुकीसाठी मंदार पाटील मैदानात! रावेरमधून भाजपच्या उमेदवारीसाठी घेतला अर्ज

जळगाव

जिल्हा बँक निवडणुकीसाठी मंदार पाटील मैदानात! रावेरमधून भाजपच्या उमेदवारीसाठी घेतला अर्ज

Editorial DeskBy Editorial DeskOctober 26, 2026Updated:October 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच रावेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असताना माजी आ. अरुणदादा पाटील यांचे पुतणे आणि बाजार समितीचे संचालक मंदार पाटील यांनी जिल्हा बँकेतून उमेदवारी अर्ज घेतला आहे. भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. या निकालाची त्यावेळी तालुक्यासह जिल्हाभर चर्चा झाली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत रावेरमधून कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

गेल्या पाच वर्षांत रावेर तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. माजी आमदार अरुण पाटील आणि मंदार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

दरम्यान, भाजपकडून अद्याप अरुण पाटील किंवा मंदार पाटील यांचे राजकीय पुनर्वसन झाले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंदार पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अरुण पाटील यांचा सहकार क्षेत्रातील संपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे या पार्श्वभूमीवर मंदार पाटील यांच्या उमेदवारी अर्जामुळे रावेरमधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, महायुती आणि भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add