Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने कणखर नेतृत्व गमावले;

राजकारण

अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्राने कणखर नेतृत्व गमावले;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 28, 2026Updated:January 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात की,अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. वक्तशीरपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यासाठी ते ओळखले जात होते. सभागृहातील शिस्तबद्ध वर्तन, सर्वसामान्यांबद्दलची आपुलकी आणि राज्याच्या विकासासाठी असलेली तळमळ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता.

विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजितदादा हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत होते. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असेही पाटील यांनी नमूद केले.

या दुःखद घटनेमुळे पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना आणि त्यांच्या असंख्य समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add