Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी; २० हजारांचा दंड

क्राईम

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी; २० हजारांचा दंड

Editorial DeskBy Editorial DeskOctober 29, 2026Updated:October 29, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचार आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी जळगाव न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. आरोपी पवन कैलास सोनवणे (वय १९, रा. नांद्रा बुद्रुक, ता. जि. जळगाव) याला सात वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत कायद्याचा कठोर बडगा पुन्हा अधोरेखित झाला आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, १८ जुलै २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नांद्रा बुद्रुक गावाबाहेरील गिरणा नदीपात्राजवळ ही घटना घडली. आरोपीने पीडितेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडिया तसेच व्हॉट्सॲपवर व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. या धमकीचा वापर करून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास अधिकारी गणेश चव्हाण यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडितेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तसेच विशेष सरकारी वकील सी. चारुलता राजेंद्र बोरसे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली, तर पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी सहकार्य केले.

सरकार पक्षाचा पुरावा आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम ३ व ४ नुसार सात वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ नुसार दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि धमक्यांच्या घटनांमध्ये दोषींना कायदेशीर शिक्षेला सामोरे जावे लागते, हा स्पष्ट संदेश गेला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

अल्पवयीन मुलीशी लग्न करून अत्याचार: यावल पोलीस ठाण्यात एकावर पॉक्सोचा गुन्हा दाखल

October 30, 2026

‘डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या शुभहस्ते ‘पातञ्जल योगसूत्राणि’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे विमोचन’

October 29, 2026

साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा : महापौर यांचे निर्देश

October 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add