Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगावात पाऊस किंवा वादळाची शक्यता मावळली, थंडी वाढणार का?

जळगाव

जळगावात पाऊस किंवा वादळाची शक्यता मावळली, थंडी वाढणार का?

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

थंडी वाढणार का?

जळगाव । जळगावसह महाराष्ट्राच्या हवामानात गेले काही दिवसांपासून होत असलेल्या चढ उतारामुळे थंडीचा कडाका कमी झाला. ढगाळ वातावरमुळे तापमानाचा पारा वाढला आहे. बुधवारी जळगावचे किमान तापमान १४.८ अंशावर तर कमाल तापमान ३१.५ अंशावर पोहोचला. दरम्यान जिल्ह्यात पाऊस किंवा वादळाची शक्यता पूर्णपणे मावळली असून हवामान कोरडे राहील.

दोन दिवसापूर्वी जळगावात अवकाळी पावसाने तडाखा दिला असून यामध्ये शेती पिकांचे मोठं नुकसान झाले. यानंतर काल हवामान स्वच्छ दिसून आले. जळगावचे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे थंडीचा जोर ओसरला असून उकाडा जाणवत आहे.

दरम्यान जळगावमध्ये पुढील तीन दिवसांत तापमानात चढ-उतार होऊन किमान तापमान १४ ते १५ अंश राहील, ज्यामुळे रात्री आणि पहाटे हलका थंडावा जाणवेल; मात्र कमाल तापमान ३० ते ३३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने दुपारी हवामान उबदार राहील.

पश्चिमेकडील वारे कमकुवत झाल्याने पावसाचे सावट दूर झाले आहे. उत्तर-पश्चिम वाऱ्यांमुळे थंडी असेल पण ती तीव्र नसेल. दरम्यान, पश्चिमेकडून येणारी हवामान प्रणाली आता कमकुवत झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस किंवा वादळाची शक्यता पूर्णपणे मावळली असून हवामान कोरडे राहील.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add