Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात बाळंतीणीची दोन मुलांसह आत्महत्या

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात बाळंतीणीची दोन मुलांसह आत्महत्या

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 29, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

चोपडा : तालुक्यातील उमर्टी गावात बुधवारी सकाळी एक अत्यंत काळजाला चटका लावणारी घटना उघडकीस आली. एका २८ वर्षीय महिलेने आपल्या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह आणि केवळ १५ दिवसांच्या नवजात बाळासह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मयत महिलेचे नाव पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८) असे असून, तिचा मोठा मुलगा विरेन (वय अडीच वर्षे) व १५ दिवसांचे नवजात बाळ अशा तिघांचे मृतदेह बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले. मंगळवारपासून पमिता ही दोन्ही मुलांसह बेपत्ता असल्याची नोंद होती.

पमिता काही दिवसांपूर्वीच बाळंत झाली होती. प्रसूतीनंतर विश्रांतीसाठी ती माहेरी आली होती. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी तिचा पती तिला पुन्हा सासरी घेऊन गेला. त्यानंतर मंगळवारी ती अचानक बेपत्ता झाली आणि बुधवारी ही दुर्दैवी घटना समोर आली.

या घटनेप्रकरणी मृत महिलेचा भाऊ आकाश पावरा याने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रसूतीनंतर अवघे १५ दिवस झाल्याने पमिताला आणखी काही दिवस माहेरीच राहू द्यावे, अशी विनंती कुटुंबीयांनी सासरच्यांकडे केली होती. मात्र सासरच्या मंडळींनी (मेहुण्यांनी) ही विनंती धुडकावून लावत तिला जबरदस्तीने सासरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मंगळवारी ती बेपत्ता असल्याची माहिती आणि बुधवारी तिच्या मृत्यूची बातमी सासरकडूनच देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add