Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»भारतीय रेल्वेकडून वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला

जळगाव

भारतीय रेल्वेकडून वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला

Editorial DeskBy Editorial DeskJanuary 30, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

रेल्वे प्रवास करण्याआधीच तपासून घ्या

जळगाव । रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी असून भारतीय रेल्वेकडून ट्रेनच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे. या ट्रेन्सच्या वेळात कधी अन् किती बदल झालाय, हे रेल्वेने प्रवास करण्याआधी तपासून घ्या. अन्यथा रेल्वे स्थानकावर गेल्यावर ताटकळत बसावे लागेल.

रेल्वेने जारी केलेले हे नवे वेळापत्रक शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. तर काही ट्रेन्सच्या वेळापत्रकात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बदल होणार आहे. या १२ ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल करण्याचा कारण ऑपरेशनल सुधारणा आहेच. पण त्याशिवाय रूळाची देखभाल आणि ट्रेनच्या वेळेवर नियंत्रण सुधारण्यासाठी करण्यात आल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगतले.

कोणत्या १२ ट्रेन्सच्या वेळात बदल होणार –
५४०२० रोहतक जंक्शन-रेवाडी जंक्शन पॅसेंजरच्या वेळापत्रकात ३० जानेवारी २०२६ पासून बदल करण्यात येणार आहे. तर ८२५०२ लखनौ जंक्शन-नवी दिल्ली तेजस एक्सप्रेसच्या वेळापत्रकात १ फेब्रुवारी २०२६ पासून बदल होणार आहे. तर २२४४९ गुवाहाटी-नवी दिल्ली एक्सप्रेस ३१ जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहे. त्याशिवाय, सिलचर-नवी दिल्ली ईशान्य संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि १२३४९ गोड्डा-नवी दिल्ली हमसफर एक्सप्रेसच्या वेळा २ फेब्रुवारी २०२६ पासून बदलणार आहेत. १४६१९ आगरतळा-फिरोजपूर कॅन्ट त्रिपुरा सुंदरी एक्सप्रेसच्या नवीन वेळा ५ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होतील, असे रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले.

२२४२७ बलिया-आनंद विहार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि १२५८३ लखनौ जंक्शन-आनंद विहार डबल डेकर एक्सप्रेसच्या वेळेत १ फेब्रुवारी २०२६ पासून बदल करण्यात आला आहे. १५५५७ दरभंगा जंक्शन-आनंद विहार अमृत भारत एक्सप्रेस आणि ५४३२९ बालामऊ जंक्शन-शाहजहानपूर जंक्शन पॅसेंजर ट्रेनच्या नवीन वेळा २ फेब्रुवारी आणि ३० जानेवारी २०२६ पासून लागू होतील. ५४०७५ बरेली जंक्शन-दिल्ली जंक्शन पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत ३० जानेवारी २०२६ पासून बदल होणार आहे, तर १३०२० काठगोदाम-हावडा जंक्शन बाग एक्सप्रेसच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add