Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शहरात कुत्र्यांचा हैदोस,नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

ताज्या बातम्या

शहरात कुत्र्यांचा हैदोस,नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 2, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

स्वच्छतेचा अभाव,बेशीस्त वाहतूक,कचरा संकलन अनियमित.

यावल प्रतिनिधी : दि.१ यावल शहरात दिवसभर आणि रात्री ठीक ठिकाणी कुत्रे संघटनात्मक हैदोस घालत आहे. कुत्रे मोठ्या संख्येने गल्ली-बोळात भर रस्त्यात हिंडत,फिरत,जोर जोराने भुंकून नागरिकांच्या अंगावर धावून जातात,चार चाकी दुचाकी वाहनांच्या मागे सुसाट वेगाने धावतात यात काही लहान मुलांना,पुरुषांना सुद्धा चावा घेतल्याने नागरिकांना दिवसा आणि रात्री रस्त्याने जाणे येणे मुश्किल झाले आहे अशी चर्चा यावल शहरात सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्ये कुत्र्यांबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे यावल शहरात अनेक ठिकाणी झाडू मारला जात नसल्याने साफसफाई होत नाही, सार्वजनिक वापराच्या ठिकाणी आणि काही खाजगी मोकळ्या जागांच्या ठिकाणी केरकचरा,घाण जागोजागी पडलेली आहे,ओला व सुका कचरा संकलनाचे काम ठेकेदार नियमित करीत नाही याकडे नगरपालिकेचे संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

यावल शहरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली खाजगी पाणीपुरवठा करणारे वाहने,मालवाहतूक करणारे वाहने,नगरपालिकेचे कचरा वाहतूक करणारे वाहने,हाथगाडी,लोट गाडीच्या माध्यमातील किरकोळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते,रिक्षा वाहतूक,मोटरसायकल,चार चाकी वाहन चालक भर रस्त्यात आणि रस्त्याने बेशिस्तपणे आप-आपले उद्योग व्यवसाय करीत असल्याने यावलकरांना पायदळ चालणे आणि वाहन चालवणे मोठे जिक्रीचे,त्रासदायक झाले आहे.

बुरुज चौकाजवळील सातोद पोलीस स्टेशन तहसील मध्ये जाणाऱ्या नागरिकांच्या सार्वजनिक रस्त्यावर भर रस्त्यावर पाणी टाकणारा चहा विक्रेत्यावर कारवाई होत नसल्याने यावल नगरपालिका प्रशासन,पोलिसांनी लक्ष केंद्रित करून योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.


यावल शहरात अनेक भागात झाडू मारणारे नियमित येत नसल्याने यावल नगरपालिकेकडे साफसफाई कर्मचाऱ्यांची,झाडू मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे का.? मनुष्यबळ पूर्ण असेल तर प्रत्येक प्रभागात दररोज झाडू मारणारे कर्मचारी जातात किंवा नाही.? याची खात्री नगरपालिका मुकडदम करतो का.?

बोरावल गेट पासून भुसावळ नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम करण्याबाबतचे कार्यारंभ आदेश सन २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत परंतु जानेवारी २०२६ पर्यंत रस्त्याचे काम झाले नाही.या रस्त्यावर दुभाजक कोणत्या प्रकारचे मंजूर आहेत.रस्त्याच्या आजूबाजूने गटार बांधकाम मंजूर आहे किंवा नाही.भुसावळ नाक्याजवळ वळणावर यावल शहरातील पावसाचे आणि वापराचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था मंजूर प्लॅन,इस्टिमेट प्रमाणे होणार आहे किंवा नाही आणि रस्त्याचे बांधकाम केव्हा सुरू होईल याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावल शहरातील ओला व सुका कचरा संकलन करण्याचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले आहे ठेकेदाराने प्रशासकीय काळात आपल्या सोयीनुसार,मर्जीनुसार ओला,सुका कचरा संकलन करून त्याचे विलगीकरण आणि संकलन झालेल्या कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया न करता नियमित पूर्ण बिल काढून आपले उखळ पांढरे करून घेत आहे.आजही ठेकेदार यावल शहरातून ओला व सुका घनकचरा अनियमित संकलन करीत आहे,

अटी शर्तीनुसार ठेकेदाराकडे ओला सुका कचरा वाहतुकीचे वाहने किती.? मजूर किती.? आणि कोणता मजूर कोणते काम करीत आहे.? तसेच संकलन केलेल्या कचऱ्याचे विलगीकरण न करता शासनाच्या अटी,शर्ती घनकचऱ्यासोबत कचऱ्यात फेकून बिल मात्र पूर्ण काढून घेत आहे याकडे नगरपालिका प्रशासन अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्यांनी आपले लक्ष केंद्रित करून प्रत्येक प्रभागात वरील सर्व कामे नियमित होण्याबाबत कार्यवाही करावी अशी यावल शहरातून मागणी होत आहे.

यावल शहरात मेन रोडवर दररोज भाजीपाला आणि इतर व्यवसायिकांचा बाजार भरत असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होत असतो,मेन रोड ने चार चाकी कार / वाहन जाऊ शकत नाही ( ट्रॅक कसा पास होईल याची कल्पना न केलेली बरी ) अशी यावल शहरात मेन रोडची परिस्थिती आहे.तसेच शुक्रवारचा आठवडे बाजार एकाच दिवशी दोन ठिकाणी म्हणजे आठवडे बाजाराची असलेल्या परंपरागत जागेवर आणि यावल शहरात मेन रोडवर भरणारा आठवडे बाजार कोणाच्या परवानगीने भरत आहे याची माहिती प्रशासनाने नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावी जेणेकरून यावल शहरात काही अप्रिय घटना घडल्यास कोण जबाबदार राहील.? याची जाणीव प्रशासनाने यावलकरांना करून द्यायला पाहिजे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add