Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड निश्चित

राजकारण

महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी यांची निवड निश्चित

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे.

जळगाव | जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स अखेर संपला आहे. महायुतीकडून आज या दोन्ही प्रतिष्ठेच्या पदांसाठी उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विरोधीगटाकडून नावे न आल्याने भाजपाच्या दीपमाला मनोज काळे यांची महापौरपदी तर शिंदेसेनेचे मनोज सुरेश चौधरी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे.

भाजपाचे जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. भाजपने ४६ पैकी ४६ जागांवर आणि शिवसेनेने २३ पैकी २२ जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. निवडणुकीनंतर महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. महापौरपद हे ‘ओबीसी महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे या पदावर कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

उज्ज्वला बेंडाळे व दीपमाला काळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या वतीने दीपमाला काळे यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवली. दुसरीकडे, ठरलेल्या सूत्रानुसार उपमहापौरपद शिवसेनेकडे गेले असून, प्रभाग-८ मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना या पदासाठी संधी देण्यात आली आहे. त्यांचीही निवड निश्चित झाली आहे.

आज या नावाची अधिकृत घोषणा करताना ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनावणे, आ. मंगेश चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.

जळगाव मनपाच्या इतिहासात ही निवड लक्षणीय ठरणार आहे. दीपमाला काळे आणि मनोज चौधरी हे दोघेही नगरसेवक म्हणून ‘बिनविरोध’ निवडून आले होते. आता महापौर आणि उपमहापौर म्हणूनही त्यांची ‘बिनविरोध’ निवड होण्याची दाट शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add