Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कृषी अनुदानाच्या नावाखाली लाचखोरीत ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कृषी अनुदानाच्या नावाखाली लाचखोरीत ; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला

जळगाव | शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीवर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. ६ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कृषी उपअधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , तक्रारदार हे जोगेवडगाव, ता. पाचोरा येथील शेतकरी असून त्यांनी शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नांगर व रोटर खरेदीसाठी पाचोरा कृषी कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जास मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी साहित्य खरेदी केले. त्यानंतर खरेदी केलेल्या साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करून अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी उपअधिकारी लिलाधर देशमुख यांनी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांची लाच मागितली, तसेच ही रक्कम अंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचा संजय पाटील याच्याकडे देण्यास सांगितले.

या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने २ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले आणि ती रक्कम धनदाई कृषी केंद्रावर देण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार तक्रारदार धनदाई कृषी केंद्र, अंबेवडगाव येथे गेला असता संजय पाटील उपस्थित नव्हता. मात्र दुकानावर असलेला नितीन निकम याने सदर रक्कम लाच असल्याची पूर्ण जाणीव असूनही पंचासमक्ष स्वीकारली. यावरून कृषी उपअधिकारी लिलाधर देशमुख, खाजगी इसम संजय पाटील व नितीन निकम यांच्याविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add