Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»खेळण्यातील नोटांनी सहा लाखांची व्यापाऱ्याची मोठी फसवणूक

ताज्या बातम्या

खेळण्यातील नोटांनी सहा लाखांची व्यापाऱ्याची मोठी फसवणूक

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

काव्यरत्नावली चौकात ठगांचा थरार;

जळगाव | बारदान खरेदीसाठी ५०० रुपयांच्या चलन नोटांची गरज असल्याचे भासवून अस्सल नोटा घेऊन त्याऐवजी मुलांच्या खेळण्यातील नोटा देत तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काव्यरत्नावली चौक परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी घडली असून याप्रकरणी २ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारदान विक्रेते प्रकाश श्रीराम प्रजापत (वय ५०, रा. प्रजापत नगर) यांना काही दिवसांपूर्वी रवींद्र तायडे नामक व्यक्तीने फोन करून दोन लाख बारदान विक्रीसाठी असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दि. २३ जानेवारी रोजी तायडे एका साथीदारासह प्रजापत यांच्या घरी आला व व्यवहारासाठी त्यांना काव्यरत्नावली चौकात घेऊन गेला.

काव्यरत्नावली चौकात ठगांच्या तिसऱ्या साथीदाराने प्रजापत यांच्याकडील एक लाख रुपये बयाण्यापोटी घेतले. उर्वरित पाच लाख रुपयांच्या १०० व २०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात त्यांना ५०० रुपयांच्या नोटांचे दहा बंडल एका पिशवीत देण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी घरी पैसे तपासले असता प्रत्येक बंडलच्या वरची एकच नोट खरी असून उर्वरित सर्व नोटांवर ‘भारतीय बच्चो का बँक’ असे लिहिलेले असल्याचे उघड झाले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रजापत यांना तीव्र मानसिक धक्का बसून त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून रवींद्र तायडे व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add